kalyan
नगरसेवक रमेश म्हात्रेंना १३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी…

kalyan – डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे नगरसेवक (शिंदे गट) रमेश म्हात्रे यांना १३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याण न्यायालयाने त्यांना ही कोठडी सुनावली असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे दर सहा तासांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

रमेश म्हात्रे यांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणात म्हात्रे यांच्यासह अन्य ३ आरोपींनाही अटक करण्यात आली असून, त्यांनाही १३ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



