kalyan

नगरसेवक रमेश म्हात्रेंना न्यायालयात हजर करण्याचे आदेश…

kalyan – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची मागणी कल्याण सत्र न्यायालयाने फेटाळली असून, रमेश म्हात्रेंना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हात्रे हे रुग्णालयात उपचार घेत असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी म्हात्रेंचे वकील ऍड. अजित पथकी यांनी केली होती.

मात्र, न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी आरोपीला प्रत्यक्ष हजर केल्याशिवाय सुनावणी घेण्यास आणि कोणतेही आदेश देण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत आरोपी माझ्यासमोर प्रत्यक्ष हजर होत नाही, तोपर्यंत कस्टडी आदेश देणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page