चोरीला गेलेले मोबाईल तक्रादारांना केले परत…

dombivali – परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत सपोआ डोंबिवली विभागातील डोंबिवली, मानपाडा, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील चोरी, गहाळ झालेले एकूण ७१ मोबाईल तक्रादारांना परत करण्यात आले आहेत. हा मोबाईल हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम ५ जुलै २०२५ रोजी लेवा भवन, मंगल कार्यालय, दत्तनगर, डोंबिवली पूर्व या ठिकाणी संपन्न झाला. त्यावेळी सुहास हेमाडे, सपोआ डोंबिवली विभाग, डोंबिवली, तसेच मानपाडा, विष्णुनगर, डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत सपोआ डोंबिवली विभागातील डोंबिवली पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस ठाणे व विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे मोबाईल चोरी व गहाळ झाले होते. गहाळ व चोरी झालेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर, संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ३ कल्याण, सुहास हेमाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, डोंबिवली यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली, मानपाडा, विष्णुनगर ठाण्यामध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नियुक्त करण्यात आली होती.

सदर पथकांनी सीईआयआर या पोर्टलचा वापर करून, तांत्रिक विश्लेषण करून गहाळ व चोरी झालेले डोंबिवली पोलीस स्टेशन २३ मोबाईल, मानपाडा पोलीस ठाणे २४ मोबाईल आणि विष्णू नगर पोलीस ठाणे २४ मोबाईल असे एकूण ७१ मोबाईल फोन अंदाजे १२,२८,०००/- रुपये किंमतीचे शोधून ते संबंधित तक्रादारांना ओळख पटवून परत करण्यात आले आहेत.