पो. ह. सचिन साळवी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव…

thane – मानपाडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे ठाणे शहर पोलीस हवालदार सचिन साळवी यांचा महाराष्ट्र दिनी गौरव करण्यात आला आहे. सचिन साळवी यांना पोलीस विभागात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस महासंचालक पदक (सन्मानचिन्ह) पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
खोडदे-गिरवणेवाडी, आबलोली या गावचे सुपुत्र असलेले सचिन साळवी हे सन २००० रोजी ठाणे पोलीस दलात सामील झाले. त्यानंतर त्यांनी पालघर,ठाणेनगर,कोपरी,बाजारपेठ,मानपाडा पोलीस स्टेशन क्राईम ब्रँच अशा ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या २५ वर्षाच्या कालखंडात त्यांनी अनेक मर्डर, दरोडा, घरपोडी व चोरी करणाऱ्या जवळजवळ २५० पेक्षा जास्त गुन्हेगारांना पकडून शेकडो गुन्हे उघडकीस आणले.
ही कामगिरी करताना अनेकदा त्यांच्या जीवावर देखील बेतली. त्यापैकी विशेष थरारक घटना म्हणजे मध्य प्रदेश येथील मूळ रहिवासी असलेल्या आरोपीस पकडताना त्याने सचिन यांच्यावर झटापटीत ३ गोळ्या झाडून पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा सचिन यांनी मोठ्या हिमतीने जोडीदार पोलीस अंमलदाराच्या मदतीने जीवाची पर्वा न करता आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले असून, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन आणि कोतुक करण्यात येत आहे.