प्रियसीची हत्या करणारा प्रियकर गजाआड…

dombivali – प्रियसीची हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकरास कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुभाष भोईर असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, हत्येसंदर्भात टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने तपास करत असताना सुभाष भोईर हत्येनंतर पळून जाण्याच्या तयारीत असून, तो कल्याणमधील दुर्गाडी ब्रिजच्या खाली येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून, सुभाष भोईरला अटक करून त्याला टिळकनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) ठाणे शहर, अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर, शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा (शोध १) ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक ३ कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोलीस उप निरीक्षक किरण भिसे, सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, पोहवा विलास कडु, पोहवा सुधिर कदम, पोहवा विजय जिरे, पोहवा सचिन भालेराव, पोना प्रविण किणरे, पोशि मिथुन राठोड, पोशि विजेंद्र नवसारे यांनी केली आहे.