देश
गोव्यातील श्री लइराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी…

panaji – गोव्यातील शिरगाव येथील श्री लइराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत काही जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरगावमध्ये सुरू असलेल्या श्री लइराई देवीच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जमले असताना ही दुर्घटना घडली. प्रचंड गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले, बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले. आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.