बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार !…

maharashtra – राज्यातील बारावीचा निकाल उद्या म्हणजे 5 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल उद्या दुपारी 1.00 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर केला जाईल. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ…
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
निकाल कसा चेक कराल?…
सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.