रिक्षा चोरी करणारा गजाआड…

Kalyan – कल्याण पूर्वेत घरासमोर पार्क केलेली रिक्षा चोरी करणाऱ्या एकास कोळसेवाडी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून चोरी केलेली रिक्षा हस्तगत केली आहे. प्रांजल बर्वे असे याचे नाव असून, प्रांजल एसी मेकॅनिकचे काम करतो. आणि त्याने दारु आणण्यासाठी रिक्षा चोरली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे आहे की, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिम्मी बाग, कर्पेवाडी कल्याण पूर्वे येथे रात्रीच्या वेळी एका घरासमोर पार्क केलेली रिक्षा अज्ञात इसमाने चोरी करून नेली असल्याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रांजल बर्वेला अटक करून त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेली ६५,०००/रू. किंमतीची रिक्षा हस्तगत केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण अतुल झेंडे, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वपोनिरी. गणेश न्हायदे, सहा. पो.निरी. दर्शन पाटील, सहा.पो.निरी. संदीप भालेराव, पोहवा बुधवंत, पोहवा जाधव, पोहवा भामरे, पोहवा वाघ, पोहवा सौंदाणे, पोहवा जरग, पोहवा कापडी, पोशि सोनवळे, पोशि सोनवणे यांनी केली आहे.