देश
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर गोळीबार…

J & K – जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे दहशवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात काही लोक जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम येथे पर्यटक एका डोंगरावर ट्रेकिंगसाठी येतात. तिथेच हा हल्ला झाला. दहशतवादी तिथे लपून बसले होते. त्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.
दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.