अट्टल गुन्हेगारावर उल्हासनगर पोलिसांची कारवाई…

Ulhasnagar – उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विकास उर्फ पप्प्या शिंदे यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे स्थानबध्द करण्यात आले आहे. तडीपार केल्यानंतरही विकास शिंदे उल्हासनगर येथे येऊन गुन्हे करत होता. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास उर्फ पप्या अशोक शिंदे याच्या विरूध्द उल्हासनगर पोलीस ठाण्यात आपखुशीने दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, गैरकायदयाची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, घरात घुसून मारहाण करणे, घातक शस्त्र जवळ वाळगणे, नुकसान करणे, शिविगाळ व दमदाटी करणे, या सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हयामध्ये विकासला अटक होऊनही त्याच्या गुन्हयांना पायबंद बसत नसल्याने त्याला दिनांक. १६.०३.२०२४ पासून ठाणे जिल्हा, बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे व रायगड जिल्हयातील कर्जत, पनवेल तालुका या हद्दीतून २ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते तरीसुद्धा विकास गुन्हे करत होता.
त्यामुळे त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यानुसार विकास उर्फ पप्प्या शिंदे याला अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.