kalyan
मोराची शिकार करणारा जेरबंद…

kalyan – जंगलात मोराची शिकार करणाऱ्या एका इसमास कल्याण (खडवली) वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. गणेश फसाळे असे याचे नाव आहे.
कल्याण वनपरिक्षेत्रातील फळेगाव वन विभागात मोराची शिकार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे कल्याण मुरबाड रस्त्यावरील रूंदे गाव हद्दीतून वीटभट्टीवर काम करणाऱ्या गणेश फसाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने जंगलात मोराची शिकार केल्याचे सांगितले तसेच त्या मोराचे अवयव शिजवले असल्याचे देखील सांगितले.
सदर प्रकरणी गणेश फसाळे याला अटक करण्यात आली असून, त्याला तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.