महाराष्ट्र
गांजा विक्री करणाऱ्यास अटक…

kolhapur – गांजा विक्री करणाऱ्यास राजारामपुरी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २ किलो गांजा हस्तगत केला आहे. किरण अवघडे असे याचे नाव आहे.
गांजा सेवन करणाऱ्या व विक्री करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई कारण्याबाबत पोलीस अधीक्षकांनी आदेशीत केले होते त्याप्रमाणे पोलिसांनी तपास केला असता, शुभम शेलार हि व्यक्ती गांजा सेवन करताना मिळून आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने किरण अवघडे याच्याकडून गांजा घेतला असल्याचे सांगितले.
त्याअनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून किरण अवघडेला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून २ किलो २०० ग्रॅम वजनाचा एकूण ५५,२००/- रुपये किंमतीचा गांजा हस्तगत केला. सदर प्रकरणी किरण अवघडे याला अटक करण्यात आली आहे.