ठाणे

१५ अवैध अग्निशस्त्रे, २८ जिवंत राऊंड जप्त, १८ अवैध गावठी दारुच्या हातभट्ट्‌या नेस्तनाबुत…

thane -१५ अवैध अग्निशस्त्रे, २८ जिवंत राऊंड जप्त करून १८ अवैध गावठी दारुच्या हातभट्ट्‌या नेस्तनाबुत करण्यात आल्या आहेत. ठाणे गुन्हे शाखेने हि कारवाई केली आहे.

आगामी सार्वत्रिक विधानसभा निवफणूक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अवैध शस्त्रे बाळगणारे व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे तसेच अवैध गावठी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विशेष मोहिम राबवून, खालील प्रमाणे कारवाई केली आहे.

१) घटक-१, ठाणे, गुन्हे शाखा यांनी राबोडी पो.स्टे. व शिळ-डायपर पो.स्टे.चे ह‌द्दीत केलेल्या कारवाईमध्ये शिवमकुमार रामकिशन व पपिलकुमार सत्रोशन लाल तसेच राहुल उर्फ काळया उर्फ मोहमद गुलजार पिर मोहमद खान यांच्याकडून २५ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा १,८५,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

२) घटक-२, भिवंडी, गुन्हे शाखा यांनी भिवंडी शहर पो.स्टे. व शांतीनगर पो.स्टे. चे हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये श्रीकांत दत्ता वाघमारे व नूर मोहमद हनिफ अन्सारी, यांच्याकडून ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०२ जिवंत राऊंड असा १,७०,६००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

३) घटक-५, वागळे इस्टेट, गुन्हे शाखा यांनी वागळे इस्टेट पी.स्टे. ये हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये सुमित चंद्रकांत पवार याच्याकडून ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०७ जिवंत राऊंड असा ११२,१२०/-रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

४) घटक-३, कल्याण, गुन्हे शाखा यांनी मानपाडा पो.स्टे. ये ह‌द्दीत केलेल्या कारवाईमध्ये दिपक भिमाप्पा कोळी याच्याकडून ३ गावठी बनावटीचे पिस्टल व ०७ जिवंत राऊंड असा ७५,०००/-रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

५) घटक-४, उल्हासनगर, गुन्हे शाखा यांनी शिवाजीनगर पो.स्टे. व हिललाईन पो.स्टे. चे हद्‌दीत केलेल्या कारवाईमध्ये गणेश सुरेश लोंढे व भगवान संभाजीत यादव यांच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राठोड असा ५१,५००/-रु कींमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

६) खंडणी विरोधी पथकाने राबोडी पो.स्टे.चे हद्‌दीत केलेल्या कारवाईमध्ये अब्दुल कलाम सलाम खान याच्याकडून ०२ गावठी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत राउंड असा ५०,०००/- रु कींमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

७) मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने कळवा पो.स्टे. हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये अमरसिंग भगवान सिंग याच्याकडून ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०४ जिवंत राऊंड असा ६०,९००/- रु कींमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर कारवाईमध्ये एकूण १५ गावठी बनावटीचे पिस्टल व २८ जिवंत राऊंड असा एकूण ७,०५,१२०/- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

तसेच अवैध गावठी दारु निर्मिती व विक्रीच्या संदर्भात गुन्हे शाखेच्या सर्व घटकांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १८ हातभट्ट्या उध्वस्त करुन त्यात एकूण ४९,७८८ लिटर वॉश व गावठी दारु असा एकूण २५,३०,१५०/-रु चा माल नष्ट केला आहे. तसेच गावठी हातभ‌ट्टी दारु तसेच अवैधरित्या विदेशी दारु विक्री करण्याबाबत १३१ कारवाया करुन त्यांच्याकडून एकूण ९,००,५९३/-रु ची ५३५२ लीटर दारु पकडण्यात आलेली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर, डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) ठाणे शहर शिवराज पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) ठाणे, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध २. गुन्हे ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध १. गुन्हे ठाणे, धनाजी क्षिरसागर, सहाय्यक आयुक्त, प्रतिबंध, गुन्हे, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या सर्व घटक कक्षांचे अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तीकरित्या केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page