मुंबई

विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप…

mumbai – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोप बहुजन विकास आघाडीने केला असून, बविआ व भाजपच्या कार्यकर्त्यांत मोठा राडा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा राडा झाला. विनोद तावडे आणि त्यांचे कार्यकर्ते विवांता हॉटेलमध्ये बसले होते. तेव्हा क्षितीज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. आणि त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं. तसेच विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोप केला.

दरम्यान, याप्रकरणी विनोद तावडे यांनी मतदारांना वाटण्यासाठी 5 कोटी आणल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. जोवर कारवाई होत नाही, तोवर तावडेंना सोडणार नाही. माफ करा मला जाऊ द्या, अशी विनंती करणारे फोन विनोद तावडे करत आहेत. 25 फोन विनोद तावडे यांनी केले आहेत, असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page