कल्याण गुन्हे शाखेने ५ लाखांचा गांजा केला जप्त…
kalyan – कल्याण परिसरात विक्रीकरीता आणलेला ५.२० लाखांचा गांजा कल्याण गुन्हे शाखेने जप्त करून तीन जणांना अटक केली आहे. गणेश जमखंडी, अमीर शेख, राज पटेल अशी या तिघांची नावे आहेत.
काही इसम मोठया प्रमाणात गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता कोळशेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील विठ्ठलवाडी स्टेशनच्या बाहेर येणार असल्याची माहिती पोशि मिथुन राठोड यांना मिळाली होती.
त्याआधारे कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विठ्ठलवाडी स्टेशनबाहेर पुना लिंक रोड परिसरात सापळा रचून सदर तिघांना अटक केली. हे तिघेहीजण श्रीराम चौकात रिक्षामधून उतरून अपर्णा डेअरीकडे येत होते.
या तिघांकडून एकूण २४ किलो ९६२ ग्रॅम वजनाचा ५,२०,०००/- रू किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत जप्त करण्यात आलेला गांजा त्यानीं ओडीसा राज्यातून विकत घेतला आणि तो गांजा कल्याण, उल्हासनगर परिसरात विक्रीकरीता घेऊन आले असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर, शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर, शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, शोध-१, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहा.पो.निरी. संतोष उगलमुगले, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस अमंलदार सहा.पो उपनिरीक्ष अशोक पवार, विलास कडु, सुधीर कदम, गुरूनाथ जरग, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनावणे, गोरखनाथ पोटे यांनी केली आहे.