kalyan

मोटार सायकल, मोबाईल चोरणारे गजाआड; ४ गुन्हे उघडकीस…

kalyan – मोटार सायकल, मोबाईल चोरणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करून ४ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून ६ मोबाईल आणि १ मोटरसायकल हस्तगत केली आहे. शहबाज शकील शेख आणि इरफान इस्माईल शेख अशी या दोघांची नावे आहेत. 

फिर्यादी ए.पी.एम.सी मार्केट कल्याण येथे त्यांच्या टेम्पोमध्ये झोपले असताना सदर आरोपींनी त्यांचा मोबाईल चोरी करून नेला असल्याबाबत  बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड आणि स.पो.निरी नवनाथ रूपवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहबाज शकील शेखला अटक केली. त्यानंतर API रूपवते आणि पो.हवा सचिन साळवी यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे इरफान इस्माईल शेखला चोरीच्या मोटार सायकलसह अटक केली.

सदर प्रकरणी पोलिसांनी दोघांकडून ६ मोबाईल आणि १ मोटरसायकल असा एकूण १,५५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी पो उप आयुक्त सचिन गुंजाळ परिमंडळ ३, ठाणे शहर, सपोआ कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनिरी सुरेशसिंग गौड, पो.निरी गुन्हे बाबासाहेब डुकले, सपोनिरी नवनाथ रूपवते, ASI सुरेश पाटील, पो.ह. सचिन साळवी, प्रेम बागुल, परमेश्वर बाविस्कर, रवींद्र भालेराव, अरुण आंधळे, राहुल ईशी यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page