मयत व्यक्तीची ओळख पटवणेबाबत…
Thane – वागळे इस्टेट पो.स्टे.ठाणे पो.स्टे.अ.मृ. रजि.नं. ५४/२०२४ सी.आर.पी.सी. १७४ मधील मयत अनोळखी इसम, वय अंदाजे ४० त ४५ वर्षे (नाव व पत्ता माहिती नाही) हा दिनांक २२/०५/२०२४ रोजी ११:५६ वाजता सव्हिल हॉस्पिटल, सर्जन कार्यालयाचे बाजुला, वागळे इस्टेट ठाणे निपचीत अवस्थेत खाली जमिनीवर पडला होता.
सदर इसमास सिव्हील हॉस्पीटल ठाणे येथे अनोळखी इसमाने उपचाराकामी ऍडमिट केले परंतु उपचारादरम्यान दिनांक २५/०५/२०२४ रोजी १४:१५ वाजता डॉक्टरांनी त्यास मयत झाल्याचे घोषीत केले आहे. त्यानंतर त्याच्यावर इनक्वेस्ट पंचनामा करण्यात आला असून, सदर मयतावर दिनांक ५/०८/२०२४ रोजी सिव्हील हॉस्पिटल, ठाणे येथे पोस्टमार्टम झाले असून, सध्या सदर अनोळखी इसमाचे शव सिव्हील हॉस्पीटल, ठाणे येथे सदर मयत बेवारस असल्याने अदयाप पावेतो त्याचे कोणी वारस आले नाहीत.
मयत इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे…
अनोळखी इसम अंदाजे वय ४४ वर्ष, चेहरा उभट, केस काळे टक्कल पडलेला पडलेला, डोळे काळ, नाक – मोठे, दात सर्व, मिशी वाढलेली, काळी दाढी, बांधा मध्यम,
तरी वरील वर्णनाच्या इसमाचा मृत्यु झाला असून, त्याचे नातेवाईकांचा व वारसाचा शोध घेऊन तपास व्हावा व मिळून आल्यास वागळे इस्टेट पोलीस स्टेशनशी संपर्क करा.
संपर्क : 022-25805252 (वागळे इस्टेट पोलीस स्टेशन)
9594941507 महेश चव्हाण (पो.उप.निरीक्षक, तपास अधिकारी)