केडीएमसीच्या वॉर्ड अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी…
डोंबिवली – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामासंदर्भात काही बिल्डरांवरती कारवाई केली परंतु काही बिल्डरांवरती कारवाई केली नाही ज्या बिल्डरांवरती कारवाई केली नाही त्या बिल्डरांवरती कारवाई करावी आणि पालिकेचे सर्व
वॉर्ड ऑफिसर (प्रभाग क्षेत्र अधिकारी) (प्रभाग क्षेत्र ह, फ, ब, क, इ, आणि इतर) यांची चौकशी करून त्यांच्यावरती देखील कारवाई करण्याची मागणी डोंबिवलीतील एका सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. यासंदर्भात त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले असून, जिल्हाधिकाऱ्यांकडे हि मागणी केली आहे.
गेल्या वर्षी के.डी.एम.सी.मध्ये एस.आय.टी. स्थापन करून ६८ बिल्डरांवरती कारवाई करण्यात आली. यामध्ये काही बिल्डरांना सोडून दिले. परंतु यामध्ये मुख्य भुमिका असणारे पालिका अधिकारी ते म्हणजे वॉर्ड ऑफिसर (प्रभाग क्षेत्र अधिकारी) यांच्यावरती देखील कारवाई करण्यात यावी.
कारण अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्याचे सर्व अधिकार यांना असतात परंतु हे अधिकारी बिल्डरांशी साटेलोटे करून संबंधित बिल्डिंग उभी करायला लावतात आणि आपले नातेवाईक किंवा इतर जवळचे मित्र याच्या नावे लाखो रुपये उकळतात. असा आरोप या पत्रात या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून, यासंदर्भात त्यांनी केडीएमसीच्या सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.