मुंबई
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन…
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (१० ऑगस्ट) पहाटे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरशी झुंज देत होते आणि त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, विजय कदम १९८० आणि ९० च्या दशकात प्रचंड लोकप्रिय होते. विजय कदम त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखले जात असे, त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्या मोठ्या प्रमाणावर गाजल्या.