महाराष्ट्र
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग…
कोल्हापूर – कोल्हापुरातील ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागली.
अगोदर खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला पुढील भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली. आणि हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवण्याचे काम सुरु केले. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.