मुंबई
३ लाखांची लाच, दोन पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

mumbai – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुरार पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. तीन लाख रुपयांच्या लाच प्रकरणात एसीबीने हि कारवाई केली आहे.
कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेसह एका पीएसआयला (PSI) लाच घेताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे. फिर्यादी वकील यांचा गुन्हा नोंद करण्यासाठी पीएसआय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती.
यामध्ये गुन्हा दाखल करताना पोलीस अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच घेतली होती. मात्र, उर्वरित एक लाखाची रक्कम घेताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे.



