डोंबिवली

बनावट औषधांची विक्री करणारे अटकेत…

dombivali – बनावट औषधांची विक्री करणाऱ्या औषध उत्पादक आणि वितरक अशा दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. Telma AM Tablets हे बनावट औषध जे ब्लड प्रेशरसाठी वापरले जाते. याप्रकरणी पोलिसांनी ८,९४,४००/- रूपये किंमतीच्या Telma AM Tablets (Telmisartan 40mg & Amlodepin 5 mg tablet IP) एकूण २७९५ स्ट्रीप जप्त केल्या आहेत.

याबाबत वृत्त असे आहे कि, औषध विक्रेता पंकज राधेश्याम उपाध्याय हा Telma AM Tablets हे बनावट औषध श्रीराम फार्मा च्या मार्फत विक्री करत होता. याबाबत औषध प्रशासन विभाग यांनी छापा टाकून त्याच्याकडून ८,९४,४००/- रूपये किंमतीच्या Telma AM Tablets (Telmisartan 40mg & Amlodepin 5 mg tablet IP) एकूण २७९५ स्ट्रीप जप्त करून मानपाडा पोलीस ठाणे येथे गु. रजि. क्रमांक ८९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १२३, ३१८(४), ३३६(३), ३४०(२), २७७, २७८, ३(५) सह औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ कलम १८ (a) (i), सहवाचन १७(b) सह शिक्षा कलम २७(b), २७(c) प्रमाणे गुन्हा दाखल केला.

त्यानंतर सदर गुह्याच्या अनुषंगाने मानपाडा पोलिसांनी पंकज राधेश्याम उपाध्याय याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात सदर बनावट औषध विवेक अजयकुमार राय हा पंकज याला देत असल्याची माहिती समोर आली. त्याअनुषंगाने पोलिसांनी विवेक अजयकुमार राय याला अटक केली.

दरम्यान, सदर गुन्हयाचा पुढील तपास अतुल शेंडे, पो. उप आयुक्त, परी-३, कल्याण, सुहास हेमाडे, सपोआ/डोंबिवली विभाग, वपोनिरी/ संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/महेश राळेभात व गुन्हे प्रकटीकरण पथक करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page