डोंबिवली

dombivali : ‘ह’ प्रभागातील पथक प्रमुख विजय भोईर यांचा अनागोंदी कारभार…

dombivali – कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर असून, ‘ह’ प्रभागातील विवाह नोंदणी कार्यालयात कार्यरत असणारे आणि अनधिकृत फेरीवाला पथक प्रमुख असणारे विजय भोईर हे कारवाईच्या नावाखाली कामगारांना ह प्रभागातून बाहेर काढून केडीएमसी हद्दीतील घनश्याप गुप्ते मार्ग रोडला पालिकेचे पथक कार्यालय या ठिकाणी येताच व पालिकेची गाडी रोडवर उभी करून पालिकेचे कामगार व अनधिकृत फेरीवाला पथक प्रमुख विजय भोईर कामगारांशी खुशाल गप्पा मारताना दिसत आहेत.

विजय भोईर यांच्यासमोर सदर ठिकाणी राजरोजपणे फेरीवाले महिला, पुरुष जोरदार धंदा करताना दिसत आहेत. तरीही या अनधिकृत फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अशा कामगारांमुळेच पालिकेची अर्थव्यवस्था बिगडली असल्याचे दिसते. याला जबाबदार पथक प्रमुख विजय भोईर ह प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत असे दसते अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत आहेत

म्हणून केडीएमसी आयुक्तांनी अशा कामगारांवरती निलंबनाची कारवाई का करू नये? असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण होत आहे.तसेच याबाबत आमच्या काही खास प्रतिनिधींनी माहिती घेतली असता, संबंधित पथक अधिकारी हे कुठल्यातरी राजकीय पक्षाचे व नेत्याचे निकटवर्तीय असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे अशा पथक प्रमुखा वरती कारवाई करायला पालिका आयुक्त घाबरत आहे असे दिसते.

दरम्यान, असेच जर चालू राहिले तर डोंबिवली फेरीवालामुक्त कसा होणार आणि सर्वसामान्य जनतेला पालिकेतून ज्या सोयी सुविधा मिळतात त्या कशा मिळणार असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page