dombivali: जबरी घरफोडी ४० तोळे सोने, ५० हजार रुपये केले लंपास…

dombivali – डोंबिवलीत जबरी घरफोडी करण्यात आली असून, यात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ४० तोळे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देसलेपाडा येथील आर. पी. रेसिडेन्सीमध्ये हि चोरी झाली. याठिकाणी आशिष यादव हे राहतात ते कुटुंबासह लग्नसमारंभासाठी गावी गेले होते. आणि त्यांच्या घराची चावी त्यांनी आपल्या बहिणीकडे दिली होती. दरम्यान, आशिष यांची बहीण घराची साफसफाई करण्यासाठी आशिष यांच्या घरी गेली असता, त्याठिकाणी घराच्या सेफ्टी डोअरची आणि मुख्य दरवाजाची कडी तुटलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी घरात प्रवेश केला असता, दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी आणि लॉकर तोडलेले दिसले. त्यांनी तात्काळ याबाबत आशिष यादव यांना माहिती दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.



