कल्याण अंमली विरोधी पथकाची मोठी कारवाई; २ कोटींचे अंमली पदार्थ केले जप्त…

dombivali – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण अंमली विरोधी पथकाने विशेष कारवाई करत २ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करत नायजेरियन सह ३ अंमली पदार्थ डिलरना अटक केली आहे.
अविनाश व्यंकटेश सदरला आणि गजेंद्रन संजीव नायडु अशी दोघांची नावे आहेत.आणि सोबत १ नायजेरीयन नागरीक आहे.
गस्ती दरम्यान पोलिसांना गणेश नगर, उंबर्ली गाव, डोंबिवली पूर्व या ठिकाणी तीन इसम आढळून आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ १ किलो ०४ ग्रॅम वजनाचा ‘मेफेड्रॉन एम.डी., १५ ग्रॅम वजनाचा ‘कोकेन’ आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच या तिघांवर मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ॥ १७३/२०२६ एन.डी.पी.एस कायदा कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी पोलिसांनी या तिघांकडून मेफेड्रोन, कोकेन, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण २,१६,६२,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त, ठाणे आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, तसेच अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परि.०३ अतुल झेंडे यांच्या सुचनेप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकातील सपोनि/अनिल गायकवाड, ग्रेड पोलीस निरीक्षक / जितेंद्र ठोके, पो.हवा./देवरे, पो.शि/राहुल शिंदे, पो.शि./अमित शिंदे, पो.शि/खुशाल नेरकर व पो.शि/खरसाण यांनी केली आहे.



