शिवीगाळ करणाऱ्या टेली कॉल सेंटरचा पर्दाफाश…
ठाणे – मोबाइल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या नातेवाईकांना तसेच इतरांना शिवीगाळ करणाऱ्या टेली कॉल सेंटरचा ठाणे खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश करून तिघांना अटक केली आहे. राहुलकुमार दुबे, शुभम ओझा, अमित पाठक अशी या तिघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळया मोबाईल नंबर वरून फोन करून त्यांच्याशी आर्वाच्च भाषेत शिवीगाळी करून, अश्लील भाषेत बोलले असल्याबाबत चितळ्सर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास केला फिर्यादी यांना ज्या मोबाईलवरून कॉल येत होता त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने सदर मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सदर सिमकार्ड असलेल्या कंपनीचा प्रतिनिधी राहुलकुमार दुबे याच्याकडे चौकशी केली असता त्याने कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण करण्याकरीता त्याच्याकडे येणा-या ग्राहकांची फसवणूक करून सिमकार्ड काढत असल्याचे सांगितले. त्यापैकी एक सिमकार्ड ग्राहकाला देऊन उरलेले सिमकार्ड त्याने भाईंदर येथील लोन रिकव्हरी डेली कॉल सेंटरला दिले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पोलिसांनी भाईंदर येथील लोन रिकव्हरी डेली कॉल सेंटरवर छापा टाकून शुभम ओझा, अमित पाठक या दोघांना अटक केली. तसेच लोन/कर्ज घेतलेले नसतानाही ग्राहकांना फोन केले व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कॉम्पुटरमधील ४ एस.एस.डी.हार्डडिस्क, १ जीएसएम गेटवे, १ टीपी लिंक कंपनीचा २४ पोर्ट स्विच, १ राऊटर, ३ मोबाईल असा एकूण ७७,३००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच, गुन्हयाच्या पुढील तपास सपोनि सुनिल तारमळे हे करीत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे, शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, विशेष कृती दल ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालोजी शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे, मपोनि/वनिता पाटील, सपोनि सुनिल नारमळे, सपोनि भूषण कापडणीस, मपोनि श्रीकृष्ण गोरे, पोउपनिरी विजयकमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, मपोउपनि कल्याण ढोकणे, सपोउपनि संजय बाबर, पोहवा सचिन शिंपी, पोहवा संदीप भोसले, पोहवा/आशिष ठाकुर, पोहवा/संजय राठोड, पोहवा/ गणेश गुरसाळी, पोहवा योगीराज कानडे, मपोहवा/शितल पावसकर, चापोना/भगवान हिवरे, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, मपोशि/मयुरी भोसले, पोहवा/निलेश जाधव, पोशि/ढाकणे, चामपोशि/शार्दुल यांनी केली आहे.