१ कोटींचे सोन्याचे दागिने चोरणारा सेल्समन…
ठाणे – १ कोटींचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सेल्समनला नौपाडा पोलीसांनी अटक केली. राहुल मेहता असे याचे नाव आहे.
सुरेश जैन यांच्या सोन्याच्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम करणारा राहुल मेहता याने विक्रीकरीता दिलेल्या दागिन्यांपैकी पैकी ३८ छोटे व मोठे सोन्याचे हार, सोन्याचे २४ जोडी कर्णफुले, ०३ सोन्याच्या चैन, ०५ सोन्याचे बाजुबंद एकूण ७० दागिने त्याचे वजन १५९९.४७० ग्रॅम व त्याची एकूण किंमत १,०५,५५,७६६/- असे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला असल्याचा नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे मिरा रोड परिसरात सापळा रचून राहुल मेहताला अटक केली. तसेच त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी २६ नेकलेस/हार, २१ कानातील कर्णफुले व ३ गळ्यातील चैन असे सुमारे ६२,१०,०००/- रुपये किंमतीचे ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने दारु पिण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने राजवंत ज्वेलर्स या ठिकाणी कामावर असताना गरज असेल तेव्हा दुकानातून सोन्याचे दागिने चोरुन त्याच्या ओळखीच्या ज्वेलर्सला विक्री करायचा.