जबरी चोरी करणारे चौघे जेरबंद…
भिवंडी – जबरी चोरी करणाऱ्या चार सराईतांना कोनगाव पोलिसांनी अटक केली. शिवा नायक, निखील कोसरे, संतोष राठोड, रवि गौड अशी या दोघांची नावे आहेत.
ठाणे-नाशिक हायवेवरील बासुरी हॉटेलसमोर, एफ.एस.सी गोडाऊनकडे जाणाऱ्या टींगसमोर नाशिक वाहिनीवर रांजनोली, भिवंडी येथे फिर्यादी टँकरच्या गाडीचे टायर चेक करण्याकरीता खाली उतरला असता त्याठिकाणी चार जणांनी मिळून फिर्यादी आणि एकाला लोखंडी कडयाने मारहाण करुन त्यांचेकडील ४६६०/- रू. रोख रक्कम ठेवलेली दोन पाकीटे आणि आधारकार्ड, स्मार्टकार्ड अशा वस्तू जबरीने काढून घेतल्या आणि नाशिकच्या दिशेने पळ काढला. याबाबत कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर चौघांना अटक करून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत केला.
सदरची कामगिरी यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे विनायक देशमुख, पोलीस उप आयुक्त, परि-२, भिवंडी श्रीकांत परोपकारी, सहा. पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, भिवंडी सचिन सांगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोनगांव पो.स्टे निशीकांत विश्वकार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे, पो.हवा मधुकर घोडसरे, पो.ना नरेंद्र पाटील, पो.शि. रमाकांत साळुंखे, पो.शि राहुल वाकसे, पोशि हेमंत खडसरे, पोशि हेमराज पाटील, पो.शि अच्युत गायकवाड, पो.शि कुशल जाधव यांनी केली असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे हे करीत आहेत.