उदयनराजेंवर प्रश्न विचारताच शरद पवारांनी उडवली कॉलर…
सातारा – सातारा लोकसभा लढविण्यासाठी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण निवडणूक लढवत नसल्याचं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे आता साताऱ्यात उमेदवार कोण असेल हे दोन दिवसात जाहीर करणार असल्याचं जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं आहे.
शरद पवार यांनी आज सातारा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी उदयनराजे यांनी तुम्हाला साताऱ्याच्या जागेसाठी संपर्क केला का? त्यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का? असा प्रश्न शरद पवार यांना पत्रकारांनी विचारला तसेच उदयनराजेंसारखी कॉलर उडवणार का? असे विचारले असता, शरद पवार यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे एकच हशा पिकला. आणि शरद पवारांना देखील हसू आवरले नाही.