विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या सराईतास अटक…
डोंबिवली – विदेशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी अटक केली. राम उर्फ शिवा फुलचंद कनोजीया असे याचे नाव आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाटा नाका परिसरात एक इसम बेकायरेदशीररित्या विनापरवाना पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून राम उर्फ शिवा फुलचंद कनोजीया याला अटक करून त्याच्याकडून १ विदेशी बनावटीचे पिस्टल आणि २ जिवंत काडतूस असा एकूण २,००,४००/- रू. किंमतीचा मुददेमाल जप्त केला. कनोजीया याच्यावर मानपाडा, डोंबिवली, पनवेल शहर, टिटवाळा पोलीस ठाण्यात यापूर्वी ६ गुन्हे दाखल आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुनिल कुराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोहवा/राजकुमार खिलारे, पोहवा/शिरीष पाटील, पोहवा/सुनिल पवार, पोहवा/संजु मासाळ, पोहवा/विकास माळी, पोहवा/दिपक गडगे, पोना/गणेश भोईर, पोना/प्रविण किनरे, पोना/यल्लापा पाटील, पोना/देवा पवार, पोना/अनिल घुगे, पोना/शांताराम कसबे, पोना/रवि हासे, पोशि/अशोक आहेर, पोशि/विजय आव्हाड, पोशि/महेद्र मंझा, पोशि/नाना चव्हाण, पोशि/गणेश बडे यांनी केली.