ठाणे
अट्टल सोनसाखळी चोरास भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक…

ठाणे – अट्टल सोनसाखळी चोरास भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ ने अटक केली आहे. अब्बास शब्बर जाफरी असे याचे नाव असून, सदर प्रकरणी पोलिसांनी १९ गुन्हे उघडकीस आणून २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सराईत इराणी टोळीतील सक्रिय सदस्य आणि अट्टल सोनसाखळी चोर अब्बास शब्बर जाफरी यास अटक करून सोनसाखळी चोरीसह मोटार सायकल चोरी व मोबाईल चोरीचे दाखल असलेले एकूण १९ गुन्हे उघडकीस आणून, ३०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३ मोटार सायकल, ४ मोबाईल असा एकूण २३,८९,०००/-रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.