मोटार सायकल चोरी करणाऱ्या सराईतांना अटक…
ठाणे – कल्याण, उल्हासनगर परिसरात मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा पोलिसांनी अटक करून ५ गुन्हे उघडकीस आणेल.
मालमत्ता गुन्हे कक्ष पोलिसांकडून मोटार सायकल चोरीबाबत समांतर तपास चालू असताना उल्हासनगर येथे दोन इसम चोरीची मोटार सायकलसह येणार असल्याची गोपनिय बातमी पोलिसांना मिळाल्याने सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून सचिन कालू सिंग उर्फ सचिन थापा आणि किसन उर्फ विकी नागेश साळुंखे यांना अटक करून त्यांच्याकडून कल्याण व उल्हासनगर परिसरातून चोरी केलेल्या एकूण १,५०,०००/- रू. किंमतीच्या ५ मोटार सायकल हस्तगत केल्या. आणि महात्मा फुले चौक, उल्हासनगर, हिललाईन, कल्याण रेल्वे, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यातील एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त दत्ता कराळे, अपर आयुक्त डॉ.पंजाबराव उगले (गुन्हे), पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, गुन्हे, ठाणे, सहाय्यक आयुक्त राजकुमार डोंगरे, गुन्हे शोध २. गुन्हे, ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी आनंद रावराणे, सपोनिरी महेश जाधव, पोहवा राजेद्र घोलप, पो.हवा अर्जुन करळे, सपोउनि नगराज रोकडे, पोहवा दिनेश कुंभारे, पोहवा संदीप भालेराव, पोहवा राजाराम शेगर, पो.अंम. अशोक पाटील, पो. अं. नवनाथ कोरडे व चालक पो.अं सदन मुळे यांनी केली.