मुंबई
पोलीस महासंचालक रजनीश सेठ निवृत्त; अतिरिक्त कार्यभार…
मुंबई – राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजनीश सेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे ते निवृत्त झाले आहेत. विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला. पुढील आदेशापर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे.