ATM कार्डाची अदलाबदल करून फसवणूक करणारा अटकेत…
कल्याण – ATM कार्डाची अदलाबदल करून लोकांची फसवणूक करणा-या सराईत गुन्हेगारास कल्याण गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. हरेश उर्फ आकाश उर्फे दैत्या राहुल प्रधान असे याचे नाव आहे.
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ७२६/२०२३ भा.दं. वि. कलम ४२०, ३४ या गुन्हयाचा समांतर तपास व.पो.निरी. नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक ३, कल्याण पोलीस करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चक्की नाका येथे सापळा रचून हरेश उर्फ आकाश उर्फे दैत्या राहुल प्रधान याला अटक केली. सदरचा गुन्हा त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत मिळून केला असल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, व निलेश सोनावणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो.नि. राहुल मस्के, सपोनि संतोष उगलमुगले, पोहवा प्रशांत वानखेडे, पोहवा बापु जाधव, पोहवा बालाजी शिंदे, पो.कॉ. मिथुन राठोड, पो.कॉ. विनोद चन्ने, पो.कॉ. विजेंद्र नवसारे, पो.कॉ. रविंद्र लांडगे यांनी केली.