१३ लाखांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त…
भिवंडी – तंबाखूजन्य पदार्थ राजनिवास सुंगधीत पानमसाला व जाफरानी जर्दा तंबाखू असा एकूण 13,82,400/- रूपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून एकास कोनगांव पोलिसांनी अटक केली.
राकेश शर्मा असे याचे नाव असून, रांजनोली नाका ब्रिजखाली, फॉरेस्ट चौकी समोर, भिवंडी येथे कोनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि कडलग, पोना हाडळ आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून छापा टाकला असता, त्याठिकाणी राकेश शर्मा हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखूजन्य पदार्थ राजनिवास सुंगधीत पानमसाला व जाफरानी जर्दा तंबाखू असा एकूण 13,82,400/- रूपये किंमतीचा माल विक्रीकरिता बेकायदेशीररित्या टेम्पोमधून वाहतूक करताना मिळून आल्याने
त्याच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. । 409/23 भा.द.वि.कलम 188,272,273,328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 23, 26(2), 26(2)(4), 27, 30(2) (अ) सह शिक्षा कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.