देश

ट्रक चालकांचा संप अखेर मागे!…

देशभरातील ट्रक चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. केंद्र सरकारची ट्रक चालकांच्या संघटनांशी सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद आंदोलन पुकारले होते. ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न झाल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा आणि ७ लाख रुपयांच्या दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं  संप पुकारण्यात आला होता. अखेर संप मागे घेण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page