ठाणे
गर्डरवरून पडून कामगाराचा मृत्यू…

ठाणे – मेट्रोचे काम सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तीन हात नाका येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो ४ चे काम सुरू आहे. त्यावेळी मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडल्याने कामागाराचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय गोपाळ चौहान असे मृत कामगाराचे नाव असून, दुपारच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच घटनास्थळी वागळे पोलीस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी मृत कामगाराला रुग्णालयात नेले.