महाराष्ट्र
नवाब मलिक सत्ताधारी बाकावर…

नागपूर – हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून, या अधिवेशनात पहिल्याच दिवशी मनी लॉंड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सहभागी झाले आहेत. आणि अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याचे दिसून आले. त्यामुळे मलिक यांनी अखेर अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक सभागृहात अजित पवार गटासोबत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसणार की शरद पवार गटाला पाठिंबा देत विरोधकांची भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर नवाब मलिक सर्वात शेवटी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.