महाराष्ट्र
पुण्यातील भिडे वाडा जमीनदोस्त…

पुणे – ऐतिहासिक भिडे वाडा अखेर जमीनदोस्त झाला आहे. महानगरपालिकेने हा वाडा जमीनदोस्त केला आहे. याच वाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती.
याबाबत वृत्त असे आहे कि, सर्व भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आणि भिडे वाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेने हा वाडा जमीनदोस्त केला. आता या जागी राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.