धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न…

ठाणे – धावत्या लोकलमध्ये एका दिव्यांग प्रवाशाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मुंब्र्यात घडली. रुमालाला आग लावून हा रुमाल प्रवाशाच्या अंगावर फेकण्यात आला. या घटनेमध्ये प्रवाशी गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद वाडेकर असे या प्रवाशाचे नाव असून, हा प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या लोकलमध्ये अपंग प्रवाशांच्या डब्यातून प्रवास करत होता. ही लोकल कळवा मुंब्रा स्थानकाच्या मध्ये येताच एका गर्दुल्यासोबत प्रमोद यांचा वाद सुरु झाला. आणि या वादात गर्दुल्ल्याने रुमालाला आग लावून तो रुमाल या प्रमोदच्या अंगावर फेकला. या घटनेत प्रमोद गंभीर जखमी झाले. दरम्यान, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.