महाराष्ट्र
शिवशाही बसचा भीषण अपघात…
गोंदिया – गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी परिसरात बस उलटून हा भीषण अपघात झाला. हि बस नागपूरहून गोंदियाकडे येत होती. बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ११ ते १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.