डोंबिवली

डोंबिवलीत मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला…

dombivali – पूर्वेत शाळेत जाणाऱ्या एका ७ वर्षीय मुलीवर १० ते १५ भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास खोणी-पलावा परिसरातील एका सोसायटीत हि घटना घडली असून, तेथील सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे या मुलीचे प्राण वाचले.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७:३० ते ८ च्या सुमारास मुलगी आपल्या शाळेच्या बससाठी सोसायटीच्या आवारातून जात होती. यावेळी तिथे बसलेल्या कुत्र्यांच्या नजरेत ही मुलगी पडली आणि क्षणात १० ते १५ कुत्रे तिच्या दिशेने धावून आले. कुत्र्यांचा कळप अंगावर येताच मुलगी प्रचंड घाबरली आणि बचावासाठी पळू लागली. यामुळे कुत्रे अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी तिचा पाठलाग करून तिला वेढले.

कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या मुलीने मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच तेथील सुरक्षारक्षकाने काठीने या कुत्र्यांना हुसकावून लावले. सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे कुत्र्यांनी मुलीचा पिछा सोडून, तेथून धूम ठोकली. त्यामुळे हि मुलगी सुखरूप वाचली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page