dombivali: मानकोली पुलावर कार रेसिंग करणाऱ्या तरुणांवर कारवाई…

dombivali – मोठागांव ते मानकोली उड्डाण पुलावर कार रेस लाऊन, स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांवर अखेर विष्णुनगर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून दंड देखील वसूल केला आहे.
पियुष द्वारकानाय म्हात्रे, वेदांत महेश सावंत, विशाल दिनेश विश्वकर्मा, प्रदीप आंबादास ढाकणे आणि कृष्णा जितेंद्र विश्वकर्मा अशी कारवाई करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

मोठागांव ते मानकोली उड्डाण पुलावर भरधाव वेगात वाहने चालवून, स्टंटबाजी केल्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्याअनुषंगाने विष्णुनगर पोलीस तसेच शहर वाहतूक शाखा डोंबिवली उप विभाग यांनी सदर वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
पियुष द्वारकानाय म्हात्रे याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १०० (२)/१७७ प्रमाणे कारवाई करून १५००/-रूपये दंड तसेच दंडाची थकबाकी ३५००/-रूपये वसूल करण्यात आलेली आहे.
वेदांत महेश सावंत याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
रेसींग करणाऱ्या गाडयाचे व्हिडीओ काढणारे विशाल दिनेश विश्वकर्मा आणि कृष्णा जितेंद्र विश्वकर्मा या दोघांविरोधात विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १९५१ चे कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई केलेली आहे.
प्रदीप आंबादास ढाकणे याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.
दरम्यान, मानकोली ब्रिज सारख्या उड्डाण पुलावर भरधाव वेगात कार, मोटर सायकल चालविल्यास अपघाता सारखा गंभीर प्रकार घडून चालक स्वतः तसेच इतरांच्या मृत्यूस कारणीभूत होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात असे प्रकार करणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण, सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, सचिन लोखंडे, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, शहर वाहतूक शाखा डोंबिवलीचे पोलीस पथक यांनी केली आहे.



