६५ बेकायदा इमारती ३ महिन्यात जमीनदोस्त करा – हायकोर्ट…
kalyan – कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील ६५ बेकायदा इमारती येत्या ३ महिन्यात जमीनदोस्त करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनास दिले आहेत. या आदेशामुळे आता हजारो नागरिक बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, गेल्या काही वर्षात बांधकामधारकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट इमारत बांधकाम परवानगी कागदपत्रांच्या आधारे ६५ बेकायदा इमारती उभारल्या. या बेकायदा इमारतींना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या इमारती अधिकृत असल्याचे दाखवून या इमारतींमधील सदनिका घर खरेदीदारांना विकल्या.
याप्रकरणी हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली त्यावेळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी या सर्व बेकायदा इमारती येत्या तीन महिन्याच्या कालावधीत तोडण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले आहेत.