एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला…
thane – एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मला आणि माझ्या पक्षाला मान्य असेल असं शिंदे यांनी स्पष्ट करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला असल्याची माहिती समोर आली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री कोणाला करायचं आहे त्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी घ्यावा. ते जो निर्णय घेतली तो आपल्याला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. आपण अडीच वर्षाच्या कार्यकाळा जे काम केलं त्यासाठी समाधानी आहोत. आपल्याला अन्य कोणत्याही पदा पेक्षा सख्ख्या बहीणींचा सख्खा भाऊ हे पद सर्वात मोठे आहे असं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्रीपदावरून मी नाराज नाही. आम्ही नाराज होऊन रडणारे नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. महायुतीचा एवढा मोठा विजय झाला आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. यासाठी आम्ही जीव तोडून मेहनत घेतली होती. मी स्वतः काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता. राज्यात सरकार बनवताना माझी कुठलीही अडचण नाही. त्यांनी मला अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत काय तो निर्णय तुम्ही घ्यावा. एनडीएचे प्रमुख म्हणून तुमचा निर्णय शिवसेनेला मान्य असेल. असं मोदी आणि अमित शाह यांना सांगितलं असल्याचं शिंदे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.