केडीएमसी अधिकाऱ्यावर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप…

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागातील एका कनिष्ठ अभियंत्यावर एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सुनिल वाळुंज असे या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे.
याची दखल शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली असून, याबाबत शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात गोंधळ घालून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात त्वरित निलंबन करण्याची मागणी केली. त्यावेळी पालिकेचे सचिव किशोर शेळके यांनी मध्यस्थी केली आणि संबंधित अधिकाऱ्याविरोधात योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, सुनील वाळुंज या अधिकाऱ्याला काही दिवसापूर्वी अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून पकडला होता. पण त्यानंतरही या अधिकाऱ्याला पुन्हा पदावर घेण्यात आले.