सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी दरोडा टाकणारे अटकेत…
नवी मुंबई – अँटी करप्शनचे अधिकारी असल्याची बतावणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी यांच्या घरी दरोडा टाकणा-या ११ जणांना रबाळे पोलीस, परिमंडळ १ पोलिसांनी अटक करून एकूण २५ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सेवानिवृत्त अधिकारी कांतीलाल यादव हे घरी असताना काही अनोळखी इसमांनी आम्ही अँटी करप्शनचे अधिकारी आहोत अशी बतावणी करून त्यांच्या घराची झडती घ्यावयाची आहे असे सांगून घरामध्ये प्रवेश करून यादव आणि त्यांच्या पत्नीला धमकावून, मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून घरातील रोख रक्कम व सोन्याचे विविध दागिने, २ मनगटी घड्याळे व बॅग असा एकूण ३४,८५,०००/- रू. चा मुद्देमाल दरोडा टाकून जबरीने घेऊन गेले असल्याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे, मुंबई, कल्याण, डोबिवली व ठाणे अशा विविध ठिकाणी सापळा रचून सदर ११ जणांना अटक करून त्यांच्याकडून २ कार, पिस्टल, ६ काडतुसे आणि १२,७५,०००/- रु. रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.