तडीपार आरोपीला शस्त्रासह अटक…
कल्याण – तडीपार असलेल्या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. अरबाज वसीम शेख असे याचे नाव आहे. बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या रेकॉर्डवरील तडीपार आलेल्या अरबाज वसीम शेख याला २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
दरम्यान, अरबाज हा कल्याण मधील ए.पी.एम.सी मार्केट मधील सार्वजनिक शौचालयाच्या समोर १ लोखंडी सुरा घेऊन फिरत असल्याची बातमी पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली होती, त्याअनुषंगाने पोलिसांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे व.पो.निरी सुनील पवार, पो.निरी कालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून अरबाजला धारदार लोखंडी सुरासह अटक केली.
तसेच त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 4, (25) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) 135 प्रमाणे कारवाई केलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा.सचिन साळवी हे करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे व.पो.निरी सुनील पवार, पो.निरी कालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रांचचे स.पो.निरी नवनाथ रूपवते,पो.हवा सचिन साळवी, पोहवा पावशे, पो हवा बाविस्कर, पो.ना कातकडे, पो.शि फड, आंधळे यांनी केली.