बोगस खत विक्री करणाऱ्या ‘या’ कंपनीचा परवाना रद्द…
धुळे – राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बोगस खत विक्री करणाऱ्या एका कंपनीचा परवाना रद्द केला आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे.
बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने तत्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड एग्रीकम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
बोगस खतांच्या संदर्भात धुळे जिल्ह्यातून तक्रारी आल्या नंतर कृषी विभागाने तात्काळ दखल घेत कारवाई करत, ग्रीनफिल्ड ऍग्रीकेम इंडस्ट्रीज या कंपनीचा खत विक्री परवाना निलंबित केला आहे.
बोगस खते-बियाणे यांची विक्री कृषी विभाग खपवून घेणार नाही. या कारवाईत सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन, बोगस खत-बी-बियाणे यांच्याबद्दल तक्रारी असतील तर शेतकरी बांधवांनी 9822446655 या नंबरवर whatsapp करावे ही विनंती. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून दिली आहे.