ठाणे
महिला वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात…

ठाणे – प्राथमिक आरोग्य केंद्र, पिवळी पथक, पिवळी गाव ता. शहापूर, जि. ठाणे येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा सोनावणे यांना ११ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे, यांनी रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार शासनाकडून किशोर वयीन मुलांकरीता आलेल्या निधीमधून बेकायदेशीर रित्या स्वतःचा हिस्साची रेखा सोनावणे यांनी तक्रारदार यांच्याकडे वारंवार मागणी केली, परंतु तक्रारदार यांनी बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्याने त्यांचे वार्षिक गोपनीय अहवाल खराब करेन असे सांगून ११,०००/- रु. ची लाचेची मागणी करून सदर रक्कम रेखा सोनावणे यांना स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.